बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. २९ मार्च रोजी सोनमने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून आज तिने आपल्या चिमुकल्यासोबतचा पहिला फोटो चाहत्यांशी शेअर केला. रुग्णालयातील बेडवर बाळाला मायेने जवळ घेतलेला सोनमचा हा फोटो पाहून नेटकरी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. “शब्दांच्या पलीकडे कृतज्ञ” (Grateful beyond words) असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. थोरला मुलगा ‘वायु’ आता मोठा भाऊ झाल्यामुळे कपूर आणि आहुजा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिने यावेळी डॉक्टरांच्या टीमचे आणि विशेषतः नीता अंबानी यांच्या ‘एचएन रिलायन्स’ हॉस्पिटलचे आभार मानले आहेत. २०१8 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या सोनम-आनंदला २०२२ मध्ये ‘वायु’ हा मुलगा झाला होता, आणि आता २०२६ मध्ये हे जोडपे दुसऱ्यांदा पालक बनले आहे.
Breaking News




