Priyanka Chopra : गोल्डन टेंपलमध्ये पोहोचली प्रियांका चोप्रा; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने

spot_img

अमृतसरमध्ये भांडी घासत केले सेवा कार्य;

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा परदेशात राहत असली तरी तिचं भारतीय संस्कृतीशी असलेलं नातं अजूनही घट्ट आहे. याचं ताजं उदाहरण तिच्या एका व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

अलीकडेच ती अमृतसर येथे गेली होती. यावेळी तिने प्रसिद्ध सुवर्ण मंदिर येथे दर्शन घेतले आणि सेवा कार्यातही सहभाग घेतला. मंदिरात इतर भक्तांसोबत बसून तिने भांडी घासत सेवा केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती अमृतसरला शूटिंगसाठी गेली होती की वैयक्तिक भेटीसाठी, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिच्या या साध्या आणि नम्र वागण्यामुळे चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे.

या कृतीतून प्रियांकाने पुन्हा एकदा भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दलचा आपला आदर व्यक्त केला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ