Poonam Pandey : पूनम पांडेचा नवा ‘स्टंट’ की आनंदाची बातमी? ‘बेबी बंप’चे फोटो शेअर करत इंटरनेटवर उडवून दिली खळबळ!

spot_img

१ एप्रिलच्या पूर्वसंध्येला पूनमची इन्स्टाग्राम पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये ‘पब्लिसिटी स्टंट’ची चर्चा जोरात

विवाद आणि पूनम पांडे यांचे नाते जुनेच आहे. नेहमीच काहीतरी अतरंगी करून चर्चेत राहणारी पूनम आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी पूनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर दोन फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये ती तिचा ‘बेबी बंप’ फ्लॉन्ट करताना दिसत आहे. टी-शर्ट वर करून तिने दाखवलेले हे मातृत्व पाहून चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे, या फोटोंना तिने कोणतेही शब्द न वापरता केवळ गर्भवती स्त्री आणि बाळाच्या इमोजीसह कॅप्शन दिले आहे, ज्यामुळे संशयाची पाल अधिकच चुकचुकत आहे.

या बातमीने सोशल मीडियावर दोन तट पडले आहेत. एका बाजूला तिचे चाहते तिचे अभिनंदन करत असताना, दुसरीकडे नेटकऱ्यांचा मोठा गट याकडे ‘चीप पब्लिसिटी स्टंट’ म्हणून पाहत आहे. अनेकांनी “या मुलाचा बाप कोण?” असा थेट सवाल केला आहे, तर काहींच्या मते हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार केलेले असावेत. उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’ असल्याने, पूनम पुन्हा एकदा सर्वांना मूर्ख बनवण्याच्या तयारीत तर नाही ना? अशी शंका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे.

पूनम पांडेचा इतिहास पाहता लोकांचा हा संशय अनाठायी नाही. गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला तिने स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दुसऱ्या दिवशी जिवंत समोर येत तिने तो गर्भाशयाच्या कर्करोगाबाबतचा जागरूकता स्टंट असल्याचे सांगितले होते. त्या घटनेमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता तिची ही प्रेग्नेंसी खरंच ‘गुड न्यूज’ आहे की प्रसिद्धीसाठी रचलेले आणखी एक नवीन नाटक, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तूर्तास तरी, पूनमच्या या ‘बेबी बंप’ फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे हे मात्र नक्की!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ