Dhurandhar 2 : ‘धुरंधर २’ चा बॉक्स ऑफिसवर १३०० कोटींचा कडाका, पण आदित्य धरला मोठा ‘डिजिटल’ झटका

spot_img

रणवीर सिंगच्या अभिनयाची परदेशातही जादू; चाहत्यांच्या तक्रारीनंतर ‘तो’ व्हिडिओ हटवला, पायरेटेड कॉपीमुळे कमाईवर परिणाम होण्याची भीती

दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत असून अवघ्या काही दिवसांतच सिनेमाने १३०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करत अनेक बड्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. मात्र, यशाच्या या शिखरावर असतानाच निर्मात्यांना पायसीचा (Piracy) मोठा फटका बसला आहे. एका युट्यूब चॅनेलवर हा पूर्ण ३ तास ४९ मिनिटांचा चित्रपट बेकायदेशीरपणे अपलोड करण्यात आला होता, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली.

चित्रपट लीक झाल्याचे लक्षात येताच चाहत्यांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करत दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम यांना सावध केले. एका चाहत्याने ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले की, “हा चित्रपट किमान ३००० कोटींची कमाई करेल इतका दर्जेदार आहे, कृपया युट्यूबवर तातडीने तक्रार करा.” या तक्रारींची दखल घेत तांत्रिक पथकाने वेगाने हालचाली केल्या आणि तो व्हिडिओ युट्यूबवरून हटवण्यात आला. या चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. जुन्या आणि नवीन कलाकारांच्या या अफलातून मिश्रणामुळे ‘धुरंधर २’ जागतिक स्तरावर गाजत असला, तरी पायसीच्या या प्रकारामुळे चित्रपट व्यवसायावर सावट निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ