Preity Zinta : मानधनावरून अभिनेत्रीने मंचावरच केली सर्वांची बोलती बंद

spot_img

पुरुषांच्या सहनशक्तीवर भाष्य करणं कपिलला पडलं महागात

एका हाय-प्रोफाइल पुरस्कार सोहळ्यात विनोदाचा बादशहा कपिल शर्मा आणि बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा यांच्यात जुंपलेली शाब्दिक चकमक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंचावर आलेल्या दिग्गज अभिनेत्रींसमोर कपिलने महिलांच्या सहनशीलतेवर मिश्किल टिप्पणी केली. “स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त सहनशक्ती असते, एखाद्या महिलेला फक्त ‘आंटी’ म्हणून पहा, तिचा चेहरा रागाने लाल होईल,” असे म्हणत कपिलने खिल्ली उडवली. मात्र, प्रिती झिंटाने दिलेले उत्तर ऐकून कपिलला काय बोलावे हेच सुचेनासे झाले.

प्रितीने थेट बॉलिवूडमधील सर्वात संवेदनशील विषयाला हात घातला. ती म्हणाली, “पुरुषांना वेदना तेव्हाच होतात, जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला त्यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळते. हीच तुमची खरी अडचण आहे!” प्रितीच्या या ‘पॉवरफुल’ पंचलाईनवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एवढ्यावरच न थांबता, सोनाक्षी सिन्हानेही कपिलला सुनावले की, ‘बजरंगी भाईजान’सारखा चित्रपट यशस्वी होण्यामागेही मुन्नीचा मोठा वाटा होता. मानधनातील तफावतीवरून प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय यांसारख्या अभिनेत्रींनी यापूर्वी आवाज उठवला होता, पण भर कार्यक्रमात प्रितीने कपिलची जिरवल्यामुळे हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ