Sonam Kapoor : कपूर घराण्यात ‘दुसऱ्या’ चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; सोनम कपूर वयाच्या ४० व्या वर्षी पुन्हा झाली आई!

spot_img

आमचे घर आशीर्वादाने भरले”, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनमने व्यक्त केला आनंद

बॉलिवूडची ‘स्टाईल आयकॉन’ सोनम कपूर सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. २९ मार्च २०२६ रोजी सोनम आणि तिचे पती आनंद आहुजा यांनी त्यांच्या दुसऱ्या पुत्राचे जगात स्वागत केले. सोनमने स्वतः इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. “कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने आम्ही ही बातमी देत आहोत की आमचे कुटुंब आता मोठे झाले आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, सोनमचा मोठा मुलगा ‘वायू’ देखील आपल्या लहान भावाच्या आगमनामुळे प्रचंड उत्साहात आहे.

२०१८ मध्ये आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर सोनमने आपल्या खाजगी आयुष्याला प्राधान्य दिले आहे. २०२२ मध्ये तिने पहिल्या मुलाला, वायूला जन्म दिला होता. सोनम आणि आनंद हे आपल्या मुलांच्या गोपनीयतेबाबत (Privacy) अत्यंत कडक असून त्यांनी वायूसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ पाळली आहे, जी कदाचित या दुसऱ्या बाळासाठीही कायम राहील. जरी सोनम गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी सतत कनेक्टेड असते. वयाच्या चाळीशीत पुन्हा एकदा मातृत्वाचा अनुभव घेणाऱ्या सोनमवर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ