IPL 2026 : हार्दिक पंड्याने शब्द पाळला; वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफवर केला लाखो रुपयांचा वर्षाव

spot_img

टीकाकारांची तोंडे बंद; सराव सत्रात मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०-१० लाखांचे चेक देऊन हार्दिकने जिंकली चाहत्यांची मने

भारतीय क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ म्हणून वारंवार टीका सोसणारा हार्दिक पंड्या सध्या एका वेगळ्याच आणि कौतुकास्पद कारणामुळे चर्चेत आला आहे. आपली विलासी जीवनशैली आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच रडारवर असलेल्या हार्दिकने आपल्या व्यक्तिमत्वाची एक अत्यंत हळवी आणि ‘दिलदार’ बाजू जगासमोर आणली आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने वानखेडे स्टेडियमवरील १० ते ११ ग्राऊंडस्टाफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचे चेक वाटून सर्वांनाच चकित केले आहे. ही केवळ एक आर्थिक मदत नसून, हार्दिकने कठीण काळात दिलेल्या शब्दाची ही पूर्तता आहे.

या मोठ्या बक्षीसामागे एक भावनिक कथा दडलेली आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हार्दिक जेव्हा वानखेडेवर तासनतास सराव करायचा, तेव्हा हे ग्राऊंडस्टाफ कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून त्याला मदत करायचे. त्यांच्या या निस्वार्थी कष्टाची जाणीव ठेवून हार्दिकने त्यांना परत आल्यावर ‘सरप्राईज’ देण्याचे वचन दिले होते. आपला शब्द पाळत हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस सेशननंतर या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या हाती लाखो रुपयांचे चेक सुपूर्द केले. सोशल मीडियावर या कृतीचे प्रचंड कौतुक होत असून, “हार्दिक हा केवळ मैदानावरचा स्टार नाही, तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहे,” अशा प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ