Urvashi Dholakia : वयाच्या १७ व्या वर्षी मातृत्व, नवऱ्याची अपुरी साथ अन् ‘कोमलिका’ बनून राज्य; अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा थक्क करणारा संघर्ष

spot_img

टीव्ही पाहायचा नाही, तर टीव्हीत जायचं होतं!’ वयाच्या ६ व्या वर्षापासून काम करणाऱ्या उर्वशीचा थक्क करणारा प्रवास

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री नेहमीच त्यांच्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील वादळांमुळे अधिक चर्चेत राहतात. चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्षाचे डोंगर उभे होते, ज्याचा त्यांनी अत्यंत धैर्याने सामना केला. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे, जिने अवघ्या १७ व्या वर्षी, जेव्हा मुली करियरची स्वप्ने पाहत असतात, तेव्हा दोन जुळ्या मुलांच्या मातृत्वाची मोठी जबाबदारी सांभाळली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय खलनायिका ‘कोमलिका’ म्हणजेच उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या उर्वशीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही, परंतु पडद्यावर जितका तिचा क्लास आणि रुबाब पाहायला मिळाला, त्यापेक्षा कितीतरी पटीने तिचा वैयक्तिक आयुष्य संघर्षाने भरलेले होते.

नुकत्याच एका टीव्ही शोमध्ये आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उर्वशीने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले. ती म्हणाली, “वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मी आई झाले. ज्या वयात मुलींचे शिक्षण पूर्ण व्हायचे असते, त्या वयात माझ्या खांद्यावर मुलांची जबाबदारी आली, परंतु मी ते आव्हान आनंदाने स्वीकारले.” आपल्या बालपणीचा एक मजेशीर आणि रंजक किस्सा सांगताना तिने स्पष्ट केले की, जेव्हा देशात रंगीत टीव्हीचा नवा ट्रेंड सुरू झाला होता, तेव्हा ती टीव्हीवरील जाहिराती तासन् तास पाहत बसायची. एकदा तिने आपल्या आईला सांगितले की, ‘मला आता टीव्ही पाहायचा नाही.’ तेव्हा तिच्या आईला वाटले की मुलीला शिक्षणात रस निर्माण झाला आहे; पण उर्वशीचा हेतू वेगळाच होता. तिला टीव्हीच्या बाहेरून बघण्यात रस नव्हता, तर तिला स्वतः टीव्हीत जायचे होते, म्हणजेच अभिनेत्री बनायचे होते. अभिनय करणे हेच तिचे एकमेव स्वप्न होते आणि त्याव्यतिरिक्त तिने आयुष्यात कधीच दुसरे काही बनण्याचा विचार केला नाही.

उर्वशीच्या या खडतर प्रवासात अनेक चढउतार आले, ज्याचा तिने एकटीने सामना केला वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या उर्वशीचे लग्न खूप लवकर झाले. लग्नानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, या कठीण काळात तिच्या पतीने तिची साथ दिली नाही आणि मुलांच्या जन्मानंतर तिला एकाकी सोडून दिले. एका बाजूला लहान मुले आणि दुसऱ्या बाजूला अभिनयाचे क्षेत्र, अशा दुहेरी भूमिकेतून वाट काढणे अत्यंत कठीण होते. पतीने पाठ फिरवल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि संकटांवर मात करत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. या संपूर्ण संघर्षात उर्वशीचे आई-वडील तिच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे राहिले. उर्वशी आजही तिच्या या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या आई-वडिलांना देते. ती कृतज्ञतेने सांगते की, “माझ्या पालकांच्या अढळ विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी या पुरुषप्रधान जगात स्वतःला सिद्ध करू शकले.”

ग्लॅमरच्या दुनियेत चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मागे अनेक अंधारे कोपरे असतात, हेच उर्वशी ढोलकियाच्या या प्रेरणादायी कहाणीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ