Sanjay Gaikwad Controversy : सिल्लोडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तीव्र आंदोलन; आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी

spot_img

जिल्हा प्रतिनिधी: विवेक रमेश चौधरी

आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरचे तरुण कार्यकर्ते प्रशांत आंबे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) वतीने सिल्लोड येथे शनिवारी, २५ एप्रिल २०२६ रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. स्थानिक शहीद भगतसिंग चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलकांनी संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी प्रशासनाकडे केली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे तालुका अध्यक्ष सय्यद अनिस यांनी केले असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते या निषेध मोहिमेत सहभागी झाले होते.

या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक वारशावर भाष्य करत सत्ताधारी विचारधारेवर निशाणा साधला. शहीद गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथाचा संदर्भ देत, शिवरायांनी स्वराज्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान स्थान दिले होते, असा पुनरुच्चार करण्यात आला. आरएसएस आणि भाजपवर टीका करताना आंदोलकांनी म्हटले की, महाराजांचा इतिहास केवळ विशिष्ट संदर्भात मांडला जात आहे, परंतु पानसरे यांच्या पुस्तकाने त्यांचा खरा आणि सर्वसमावेशक इतिहास जगासमोर आणला आहे. या प्रकरणावरून सिल्लोड परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आमदारांवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ