Pune Crime : प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरला; मृत्यूशी झुंज देताना पीडितेने कागदावर लिहून सांगितली आरोपीची ओळख

spot_img

नराधम प्रियकराचा क्रूरपणा: घरात एकटी असल्याचा साधला फायदा; चंदननगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता चंदननगर परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराने ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची भीषण घटना समोर आली आहे. एकाच मॉलमध्ये काम करणाऱ्या पीडित तरुणीचे दिलीप राठोड याच्याशी प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. पीडितेचा भाऊ आणि वहिनी कामावर गेल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरी घुसून वाद घातला आणि संतापाच्या भरात ब्लेडने तिचा गळा चिरून पोबारा केला. अत्यंत जखमी अवस्थेत असलेल्या पीडितेने स्वतःच्या भावाला व्हिडिओ कॉल करून मदतीसाठी बोलावले, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळ्यावर गंभीर वार झाल्याने तरुणीला बोलता येत नव्हते, मात्र मृत्यूशी झुंज देत असताना तिने प्रचंड धैर्याने पेन आणि कागद मागून घेतला आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून पोलिसांना खरी माहिती दिली. या जबाबाच्या आधारे चंदननगर पोलिसांनी नराधम दिलीप राठोडला अटक केली असून, सध्या पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ