Otur Police Recover Stolen Gold Ornaments : गुन्हेगारांना ‘चकवा’ अन ४ लाखांचे दागिने ‘परत’! ओतूर पोलिसांची वाखाणण्याजोगी कामगिरी

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.१७ जून [ रमेश तांबे ]

नेतवड कुटेमळा ( ता.जुन्नर ) येथे वृद्धाच्या घरी घरफोडी करून, पेटीत ठेवलेले सोन्याचे दागीने अज्ञात इसमाने घरफोडी चोरी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.या घटनेचा ओतूर पोलिसांनी अवघ्या एक महिन्यात छडा लावून,आरोपीस जेरबंद करून,आरोपीने चोरलेले ४ लाख २० हजार रूपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागीने  मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली.

दि.१ मे ते दि.७ मे रोजीचे नेतवड, कुटे मळा ता. जुन्नर जि. पुणे येथील बजाबा महादु कुटे वय ९५ वर्षे यांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागीने त्यांच्या घराच्या पोटमाळ्यातुन खाली उतरून घरामध्ये असलेल्या पेटीचा कडी कोयंडा तोडून,पेटीत असलेले तीन तोळे वजनाचे व १ लाख ८० हजार रूपये किमतीचे मनीमंगळसुत्र, १ लाख ५० हजार रूपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे ६ सोन्याचे पान व १ पुतळा, ३० हजार रूपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची नथ ४) ६० हजार रूपये  किमतीची १ तोळा वजनाची सोन्याच्या पेट्टया असा एकुण ४ लाख २० हजार रूपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागीने अज्ञात इसमाने घरफोडी चोरी करून चोरून नेला होता.याबाबत तान्हाजी बजाबा कुटे वय ५६ वर्षे रा. नेतवड कुटेमळा ता.जुन्नर जि.पुणे यांनी ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने विविध कलमान्वये अज्ञात इसमाचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल केल्यानंतर ओतूर पोलीसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला असता सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांच्या घराच्या बाजुला राहण्यास असलेला अभिषेक खंडु कुटे वय-३२ वर्षे सध्या रा. टिटवाळा ठाणे मुळ रा.नेतवड कुटेमळा ता. जुन्नर जि.पुणे याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

सदरच्या आरोपीस दि.१३ मे रोजी अटक करण्यात आली असुन, अभिषेक कुटे याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून ,सदरच्या आरोपीने चोरी केलेले तीन तोळे वजनाचे मनीमंगळसुत्र, अडीच तोळे वजनाचे ६ सोन्याचे पान व १ पुतळा, अर्धा तोळयाची सोन्याची नथ व १ तोळा वजनाची सोन्याच्या दोन पेटया असे एकुण ४ लाख २० हजार रूपये किमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे सर्व दागीने जप्त करून. सदरचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून एक महिन्यामध्ये  फिर्यादी नामे तान्हाजी बजाबा कुटे वय ५६ वर्ष रा नेतवड, ता,जुन्नर,जि. पुणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.सदर कार्यवाही पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधिक्षक शुभमकुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरिक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार बाळशिराम भवारी, पोलीस शिपाई आशिष जगताप व पोलीस शिपाई विशाल गोडसे यांनी केली.चोरी गेलेल्या सोन्याच्या ऐवज ओतूर पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल कुटे कुटुंबीय  नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ