Menstrual Cycle : वयाच्या १० व्या वर्षाआधीच मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले

spot_img

मोबाईलचे वेड, जंक फूड आणि बदलती जीवनशैली ठरतेय कारणीभूत; तज्ज्ञांनी व्यक्त केली पालकांसाठी चिंतेची बाब

पूर्वीच्या काळी मुलांचे बालपण मैदानावर खेळण्यात जायचे, मात्र आता त्याची जागा मोबाईल स्क्रीनने घेतली आहे. या बदलत्या जीवनशैलीचा सर्वाधिक फटका लहान मुलींच्या आरोग्याला बसताना दिसत आहे. विशेषतः मुलींमध्ये वयाच्या १० व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू होण्याचे (Early Puberty) प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. स्त्रीरोग सल्लागार डॉ. दीप्ती अश्विन यांच्या मते, यामागे लठ्ठपणा हे एक मुख्य कारण आहे. शरीरातील चरबी वाढल्यामुळे ‘लेप्टिन’ संप्रेरक (Hormone) सक्रिय होतो, जो मेंदूला लवकर वयात येण्याचे संकेत देतो. याव्यतिरिक्त, जंक फूडचे अतिसेवन आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे मुलींच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या क्रियेला अकाली गती मिळते.

केवळ आहारच नाही, तर आपल्या सभोवतालच्या प्लास्टिकच्या वस्तूंमधील ‘बीपीए’ आणि सौंदर्यप्रसाधनांमधील पॅराबेन्ससारखी घातक रसायने देखील हार्मोनल संतुलन बिघडवत आहेत. तसेच, थायरॉईड किंवा पीसीओएस (PCOS) सारख्या आजारांमुळेही हा बदल घडून येतो. या समस्येपासून मुलींना वाचवण्यासाठी पालकांनी त्यांना घरचा सकस आहार देणे, दररोज किमान एक तास मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा शारीरिक बदलांच्या वेळी मुलींशी मोकळा संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे आणि गरज पडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ