Real Estate Investment : रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा ‘सुवर्णकाळ’; दोन वर्षांत ३० अब्ज डॉलरची विक्रमी गुंतवणूक

spot_img

भारतीय मालमत्ता बाजारात ८८ टक्क्यांची मोठी झेप; टियर-२ शहरे आता विकासाची नवीन केंद्रे

भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र सध्या ऐतिहासिक तेजीचा अनुभव घेत आहे. २०२४ ते २०२६ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत या क्षेत्रात तब्बल ३०.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यामध्ये ८८ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. केवळ मुंबई, दिल्लीसारखी मोठी शहरेच नव्हे, तर आता टियर-२ शहरे देखील गुंतवणुकीचे मुख्य केंद्र बनत आहेत. रस्ते, मेट्रो आणि विमानतळांच्या विस्तारामुळे जमिनीची खरेदी आणि आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

आजचा खरेदीदार केवळ भिंतींचे घर न शोधता एक दर्जेदार जीवनशैली शोधत आहे. त्यामुळेच हिरवळ, सुरक्षा आणि आधुनिक सुविधा असलेल्या प्रकल्पांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, बदलत्या सामाजिक रचनेमुळे ज्येष्ठ नागरिक गृहनिर्माण प्रकल्पांची मागणीही वेगाने वाढत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे या क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण झाली असून, विकसकांना मोठ्या प्रकल्पांसाठी चांगला निधी उपलब्ध होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ