Anjali Damania : अशोक खरात प्रकरणात अंजली दमानियांचा चंद्रकांत पाटीलांवर थेट निशाणा

spot_img

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि प्रभावशाली व्यक्तींना कोट्यवधींचा गंडा घातल्याच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता नव्या राजकीय आरोपांची भर पडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

दमानिया यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोसोबत त्यांनी सरकार आणि नेत्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारी पोस्ट लिहिली आहे. “कमीत कमी स्वतःचं वय तरी पाहायचं होतं. हीच जर मंत्र्यांची परिपक्वता असेल, तर देवा तुच देश वाचव,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी यापूर्वीही या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. काही मोठे राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्ती अशोक खरात यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने केवळ सामाजिकच नाही तर राजकीय स्तरावरही मोठी खळबळ उडवली आहे.

दरम्यान, या पोस्टनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, राजकीय संबंध आणि कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणीही होत आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ