spot_img

Raindrop Bangles : सोशल मीडियावर रेनड्रॉप बांगड्यांची क्रेझ; महिलांची नवी फॅशन पसंती

spot_img

रंग, डिझाइन आणि शाही लूकमुळे रेनड्रॉप बांगड्या ट्रेंडमध्ये

आजकाल सोशल मीडियावर रेनड्रॉप बांगड्यांचे आकर्षक डिझाइन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विविध रंगसंगती आणि अनोख्या पॅटर्नमुळे या बांगड्यांनी महिलांपासून तरुणींपर्यंत सर्वांची मने जिंकली आहेत. छोट्या कौटुंबिक कार्यक्रमांपासून ते भव्य लग्न समारंभापर्यंत, कोणत्याही प्रसंगासाठी या बांगड्या परफेक्ट ठरत आहेत. पारंपरिक तसेच मॉडर्न आऊटफिटवर या बांगड्या खास शोभून दिसतात. विशेष म्हणजे, या बांगड्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सहज उपलब्ध आहेत.

क्रिस्टल डिझाइन रेनड्रॉप बांगड्या

या डिझाइनमध्ये बांगड्यांवर लहान-लहान, विविध रंगांचे क्रिस्टल्स बसवलेले असतात. थेंबासारख्या आकाराचे हे क्रिस्टल्स प्रकाशात अधिक चमकदार दिसतात. बहुरंगी बांगड्या आवडणाऱ्यांसाठी हे डिझाइन पारंपरिक तसेच इंडो-वेस्टर्न पेहरावावर उत्तम पर्याय ठरत आहे. तसेच, लटकन स्टाईल रेनड्रॉप बांगड्यांमध्ये मोती किंवा घुंगरू असतात, जे लग्नसमारंभात हेव्ही आणि रॉयल लूक देतात.

पेस्टल शेड्स रेनड्रॉप बांगड्या

पेस्टल रंगांच्या आऊटफिट्सचा ट्रेंड वाढत असताना, त्यावर मॅच होणाऱ्या रेनड्रॉप बांगड्यांचीही मागणी वाढली आहे. सौम्य रंगसंगती आणि नाजूक डिझाइनमुळे या बांगड्या ऑफिस पार्टी किंवा दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांसाठी विशेष पसंतीस उतरतात.

ट्रान्सपेरंट डिझाइन

मेटल किंवा काचेच्या बांगड्यांसोबत घातल्यास ट्रान्सपेरंट रेनड्रॉप बांगड्या अधिक आकर्षक दिसतात. तरुणी आणि नववधूंमध्ये या डिझाइनला मोठी लोकप्रियता मिळत असून, हातात घातल्यावर या बांगड्या अत्यंत एलिगंट लूक देतात.

ड्युअल शेडेड डिझाइन

दोन रंगांच्या आकर्षक संगमामुळे ड्युअल शेडेड रेनड्रॉप बांगड्या सध्या फॅशनमध्ये आघाडीवर आहेत. मॉडर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या पेहरावावर या बांगड्या परिपूर्ण शोभा देतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ