spot_img

Pune News : पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; 2 कोटींचे कपडे 9 वर्षांपासून पडले धूळ खात

spot_img

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अनागोंदी कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. 9 वर्षांपूर्वी खरेदी केलेले 2 कोटी रुपयांचे गणवेश, साड्या आणि इतर साहित्य कर्मचाऱ्यांना वाटलेच नसल्याचे उघड झाले आहे. हे साहित्य वडगाव बुद्रुक येथील एका अभ्यासिकेत धूळ खात पडून आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत महानगरपालिका आयुक्तांनी 20 आजी-माजी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. दिवटे यांनी सादर केलेल्या अहवालात तक्रारीतील तथ्य समोर आलं आहे. 9 वर्षे उलटल्यामुळे आता या कपड्यांची अवस्था खराब झाली असून ते वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. या प्रकरणी जबाबदार असलेल्या २० कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यामध्ये काही निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. करदात्यांच्या २ कोटी रुपयांच्या साहित्याची अशा प्रकारे धूळधाण झाल्याने नागरिकांमधून मोठया प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ