spot_img

Chhatrapati Sambhajinagar : मध्यरात्री भयानक घडलं! तरुणाने तरुणीला ओढत नेल्याने खळबळ

spot_img

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील नागेश्वरवाडी परिसरात मध्यरात्री एका तरुणाने तरुणीला भररस्त्यात ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १० ते १५ मिनिटं आरोपी तरुण तरुणीला ओढत घेऊन जात होता. विविध CCTV कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास घडला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कुणीच बाहेर नव्हतं. ज्याचा फायदा या तरुणाने घेतला.

भररस्त्यावर सुमारे १० ते १५ मिनिटं हा थरार रस्त्यावर सुरू होता. सुदैवाने, परिसरातील एका जागरूक नागरिकाला लक्षात येताच त्याने खिडकीतून जोराने आवाज दिल्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणी तिथून निघून गेले. घटनेच्या पाच दिवसांनंतर हे फुटेज समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी कुठे असते? असा सवाल आता विचारला आहे. या प्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये. हे तरुण आणि तरुणी नेमके कोण होतं? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाहीये. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ