spot_img

Deepesh Sharma : अभिनेत्री शमिता शेट्टीचं नाव जोडलं जातंय या उद्योगपतीसोबत!

spot_img

अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. शमिताने स्वतः एक गोंडस व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं की, “आणखी एक वर्ष वाढलं, पण आता अधिक समजूतदार आणि आनंदी!” मात्र, हाच वाढदिवस एका वेगळ्याच चर्चेचं कारण ठरला. एका स्पेशल व्यक्तीने शमिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर अफवांचा धुरळा उडाला.

प्रसिद्ध उद्योजक आणि कलाकार दीपेश शर्मा याने शमिताच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही खास अनसीन फोटो शेअर केले. पण फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
दीपेशने लिहिलं, “जिच्यामुळे मला सतत हसू येतं, त्या माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! जिला माझ्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तरीही ती माझ्यासोबत आहे. लव्ह यू, माय शॅमस्टर!” यावर शमितानेही ‘Awww’ म्हणत हार्ट इमोजीसह रिप्लाय दिला. यावरून आता “शमिताला नवीन जोडीदार मिळाला,” अशा चर्चांना उधाण आलं. मात्र या अफवांनी शमिताचा पारा चढला. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कडक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की, ती कोणालाही डेट करत नाहीये.शमिता म्हणाली, “मी सिंगल आहे आणि अत्यंत शांततेत माझं आयुष्य जगतेय. केवळ एका खऱ्या मैत्रीचा असा चुकीचा अर्थ काढणं बंद करा. हे सगळं अत्यंत हास्यास्पद आणि निव्वळ मूर्खपणा आहे.” तिने अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावत आपल्या आणि दीपेशच्या नात्यावर पडदा टाकला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ