सनासुदीत ग्राहकांच्या खिशाला कात्री !
भारतात सणांची मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे महिलांमध्ये दागिन्यांची मागणी देखील वाढली आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.मागील काही वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.जागतिक बाजारात (International Market) आर्थिक मंदीचे सावट आल्यामुळे गुंतवणूक दारांचा कल सोन्याकडे वाढलाय. आर्थिक अस्थिरता असल्यास सोन्यामध्येच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जातेय.आज तर भारतात सोन्याच्या किंमतीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.बाजारातील होणारी सोन्याची मागणी व पुरवठा यावरून किंमत वाढते किंवा घसरत असते.आज चांदीची किंमत प्रति ग्राम 157 रूपये इतकी आहे. तर प्रतिकिलो चांदीची (Silver) किंमत 1,57,000 रूपये इतकी आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,23,000 रुपये वर पोहोचला आहे. तर 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली असल्या कारणाने सोनं घ्यावं की नाही? असा प्रश्न ग्राहकांना पडलाय. आजचे भारतीय बाजारातील सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे –
18 कॅरेट सोन्याची किंमत –
1 ग्रॅम: 9,253 रुपये
8 ग्रॅम: 74,024 रुपये
10 ग्रॅम: 92,530 रुपये
100 ग्रॅम : 9,25,300 रुपये
22 कॅरेट सोन्याची भारतातील किंमत –
1 ग्रॅम: 11,305 रुपये
8 ग्रॅम: 90,440 रुपये
10 ग्रॅम: 1,13,050 रुपये
100 ग्रॅम: 11,30,500 रुपये
24 कॅरेट सोन्याची भारतातील किंमत –
1 ग्रॅम: 12,332 रुपये
8 ग्रॅम: 98,656 रुपये
10 ग्रॅम: 1,23,320 रुपये
100 ग्रॅम: 12,33,200 रुपये




