नवी मुंबई, विजय गायकवाड
रक्तदान हे सर्व श्रेष्ठ असून प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. कारण शासकीय रुग्णालयात रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा खर्च सर्वसामान्य रुग्णाला परवडत नाही. यामुळे कै.राकेश म्हात्रे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गेल्या 20 वर्षांपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरीब व गरजू रुग्णांना रक्त मिळते. असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉ.धनोज घपाट यांनी यावेळी केले. दि.3 फेब्रुवारी रोजी ऐरोली सेक्टर 5 येथील जय भवानी चौकात कै.राकेश (आष्ट्या ) म्हात्रे 20 व्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस कै.राकेश म्हात्रे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू पाटील,अंनत सुतार,अंकुश सोनावणे हे उपस्थित होते. कै. राकेश (आष्ट्या) म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉ.धनोज घपाट,संस्थेचे अध्यक्ष राजू शिंगे,सचिव साई गायकवाड,खजिनदार अविनाश मिश्रा, सुजित न्यायनिर्गुने,अतुल देशमुख,जयेश म्हात्रे,शिवा काटकर व अन्य सभासद उपस्थित होते.




