बॉलिवूडची फॅशन आयकॉन आणि अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या आपल्या आयुष्यातील एका अतिशय सुखद दिवसांत जगत आहे. सोनम दुसऱ्यांदा आई होणार असून, सध्या ती तिचे मॅटर्निटी डेज पूर्णपणे एन्जॉय करताना दिसतेय. पण यावेळी सोनमने ज्या हटके स्टाईलमध्ये आपलं बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट केलं आहे, ते पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सोनमचं हे रूप पाहून चाहते थक्क झाले असून, एका वेगळ्याच चर्चेला आता तोंड फुटलं आहे.
नुकतंच सोनम कपूरला मुंबईत एका आउटिंग दरम्यान कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. यावेळी सोनमने नेहमीप्रमाणे आपल्या फॅशन सेन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने चक्क ओपन शर्ट स्टाईल आउटफिट घालून बिनधास्त आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला. सोनमच्या चेहऱ्यावरचा तो प्रेग्नेंसी ग्लो आणि तिचा आत्मविश्वास पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. फॅशन म्हणजे केवळ कपडे नसून तो एक अॅटिट्यूड आहे, हे सोनमने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.




