spot_img

Amol Mitkari : अमोल मिटकरींच्या भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती

spot_img

“प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही” – व्हायरल पोस्टमधून उपस्थित केलेल्या पाच मुद्द्यांची राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स (ट्विटर) वर केलेल्या एका भावनिक पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देत काही अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवगिरी येथील कार्यालयातील दोन खुर्च्यांचा उल्लेख करत मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक खुर्ची ही सामान्य नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकणाऱ्या नेत्याची, तर दुसरी अजित पवार यांची असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या दृश्याने मन हेलावल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मिटकरी यांनी स्पष्ट केलं की, “मृत्यूचं राजकारण करणं हे पाप आहे”, मात्र मनात निर्माण होणारे प्रश्न व्यक्त करणं चुकीचं नाही. त्यांनी उपस्थित केलेल्या पाच मुद्द्यांमध्ये अपघातातील मृतांची संख्या, प्रवासी यादीतील विसंगती, घटनास्थळी कागद न सापडणं, तसेच वारंवार बदलले गेलेले पायलट यांचा उल्लेख आहे.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून, काही जण याला संशयाच्या नजरेने पाहत आहेत तर काहींनी संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. अमोल मिटकरी यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ