spot_img

Govinda-Sunita Relation : गोविंदाच्या भाच्याने मामी सुनितावर गंभीर आरोप केल्याने खळबळ !

spot_img

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा (Govinda Ahuja) आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अशातच गोविंदाच्या भाच्याने विनय आर.आनंद याने पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये विनय आर.आनंद म्हणालाय की,”मी नेहमीच माझा मामा गोंविदा याच्या संपर्कात आहे. अलीकडेच मी त्यांना भेटलो सुद्धा आहे. शिवाय, मी मामी सुनीतासोबतही फोनवर बोलत असतो. ” पुढे विनय असंही म्हणाला की, “परंतू मीच आता मामीला घाबरतोय. जर त्यांनी माझ्या मामाची वाट लावली आहे, तर त्या माझी वाट लावायलाही कमी करणार नाही. जर मी काही बोललो तर माझीच अडचण होईल. कोण रिस्क घेणार आहे?” विनय आनंदने मामा-मामीच्या घटस्फोटाबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केलंय, तो म्हणाला की, “देवाने असं नको करायला. जर एखादं नातं तुटण्याबद्दल आधीच ठरलेलं असेल, तर मग कुणीही काहीही करू शकत नाही. अजूनपर्यंत ते दोघे एकत्र आहेत. म्हणजेच देवाची इच्छा आहे की, काहीही वाईट घडू नये. मामांनी मला सांगितलं की हा त्यांचा कठीण काळ आहे. ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की हा वाईट काळ दूर व्हावा.”

“मी मामाला विचारलं खरंच असं काही आहे का, तर त्यांनी मला नाही असं सांगितलं. आता मी हेही म्हणणार नाही की, माझी मामी चुकीची आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल आणि आता त्यांना सर्व काही पटवून देणारेही फक्त मामाच आहेत. पण मला आशा आहे की दोघांमध्ये जे काही सुरू आहे ते लवकरच ठीक होईल. मामा-मामी चुकीचे नाहीत.” असंही विनय म्हणाला. दरम्यान, विनय आनंद विषयी बोलायचं तर, विनय आनंद भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच त्याने एकता कपूरच्या ‘एसीपी विक्रांत’ वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 19 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर विनयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ