spot_img

Saurabh Shukla : इंडस्ट्रीमधील वर्क कल्चरवर सौरभ शुक्ला स्पष्टच बोलले

spot_img

हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) यांनी आठ तासांच्या शिफ्टवर भाष्य केले आहे. याशिवाय अलीकडेच गायक एआर रहमान यांनी जाहीर केलेल्या निवृत्तीवरही भाष्य केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सौरभ शुक्ला यांनी या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले आहे. इंडस्ट्रीतल्या वर्क कल्चरवर सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. आठ तासांच्या वर्क कल्चरबद्दल सौरभ शुक्ला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्याने उत्तर दिले की, कामाच्या वेळेसाठी मानवी मर्यादा असल्या तरी, सर्वांना समान मानकांवर ठेवणे अन्याय्य आहे. त्याच्यासाठी, कठोर क्रिएटिव्ह फ्लो जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कामाच्या ओघात असाल तर मला खरं वाटतं की तुम्ही अचानक आपल्या कामापेक्षा अर्धा तास किंवा एक तास जास्त काम करू शकता. तुम्ही आपल्या कामाबाबतीत तक्रार करू शकत नाहीत. कारण तुम्हाला त्या कामाच्या ओघात खूप काही शिकायला मिळतं. विचारांची आणि प्रवाहाची सातत्यता तुम्हाला अनुभवायला मिळते, शिकायला मिळते.”

गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींकडून सुरू असलेल्या वर्ककल्चरबद्दल त्यांनी भाष्य केले. युक्तीवादाबद्दल त्यांची वस्तुस्तिथी होती. कलाकारांचे अंतिम लक्ष्य ठरलेले असायला हवे. आपण काम किती वेळ केलं? कशापद्धतीने केलंय? यावर लक्ष द्यायला हवं. घड्याळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ‘अरे! 6 वाजले, 8 वाजले आणि मला घरी जायचे आहे.’ याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही करत असलेल्या कामावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. ते कशापद्धतीने वेगळ्या पद्धतीने करेल, याकडे लक्ष द्या.’ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कामाचे तास नियंत्रित करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्या दृष्टीने त्यांनी हे विधान केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ