spot_img

Silver Price : उच्चांकावरून झपाट्याने घसरली चांदी, MCXवर चांदीचे विक्रमी दर

spot_img

Gold आणि चांदीच्या दरांनी मागच्या १०० वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आजवर इतके दर याआधी कधीच गेले नव्हते. चांदीचे दर ४ लाख रुपयांवर पोहोचले होते. आता झटक्यात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. चांदी जवळपास २५ हजार रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींना आज शुक्रवारी जोराचा ब्रेक लागला आहे. बाजार उघडताच मौल्यवान धातूंचे दर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले असून चांदीने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या भावात तब्बल २४,००० ते २५,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

काल गुरुवारी चांदी (Silver) ने इतिहास रचत ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आज सकाळच्या सत्रात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला. चांदीचे फ्युचर्स दर सुमारे ६ टक्क्यांनी म्हणजेच २४,००० रुपयांनी कोसळून ३,७५,९०० रुपये प्रति किलोवर आले आहेत. गुरुवारी चांदी ४.०७ लाखांच्या वर होती, तिथून आज मोठी पडझड झाली आहे. चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा भाव ६ टक्क्यांहून अधिक म्हणजे १०,००० रुपयांपेक्षा जास्त घसरला. गुरुवारी सोन्याने १.८० लाखांचा टप्पा पार केला होता, तो आज थेट १,५९,२५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर खाली आला आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ