spot_img

Congress VS Aimim Clash : अकोल्यात काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांत तुफान राडा !

spot_img

अकोल्यामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवड झाली. त्यानंतर सभागृहात हा तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा MIMच्या नगरसेवकांचा आरोप आहे.

काँग्रेस (Congress) आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले. एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले, त्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर राड्यामध्ये झालं. काँग्रेसनं दादागिरी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. अकोला महानगरपालिकेचा पहिलाच दिवस राड्यानं गाजला. दरवेळी प्रमाणे याहीवेळी हा दिवस तुफान राड्याने गाजला आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ