spot_img

Dharashiv News : प्रजासत्ताक दिना दिवशीच पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत

spot_img

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना धाराशिव जिल्ह्यातून एक अतिशय वेदनादायी घटना समोर आली आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड इथं एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर हा अनर्थ घडला आहे. मोहन जाधव (Mohan Jadhav) हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि तिरंग्याला सन्मानाने सलामी दिली. कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थितांसोबत फोटो काढत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही समजण्याच्या आतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती.

मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख होती. त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. मात्र, पदोन्नतीचा आणि राष्ट्रीय उत्सवाचा हा आनंद नियतीने हिरावून नेला. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली ही सलामी त्यांची अखेरची सलामी ठरली.या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्या व्हिडीओमध्ये मोहन जाधव हे आपल्या काही सहकाऱ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी फोटोसेशन सुरू असताना एका सेकंदाच्या आत ते जमीनीवर धडकन कोसळले. त्यांना स्वत:ला सावरायला एक सेकंदही मिळाला नाही. क्षणात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ