spot_img

IND vs NZ : इंदूरमध्ये आज रंगणार निर्णायक सामना भारत–न्यूझीलंड मालिकेचा विजेता कोण ठरणार?

spot_img

1-1 बरोबरीनंतर तिसऱ्या एकदिवसीयात दोन्ही संघांसमोर ‘करो किंवा मरो’ची लढत

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या 2026 मधील पहिल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा निकाल आता अंतिम सामन्यात ठरणार आहे. दोन सामने झाल्यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, रविवारी होणाऱ्या तिसऱ्या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पहिल्या सामन्यात यजमान भारताने दमदार कामगिरी करत मालिकेची विजयी सुरुवात केली होती. बडोद्यात न्यूझीलंडने दिलेले 301 धावांचे आव्हान भारताने अवघ्या 6 विकेट्स गमावून सहज पार पाडले आणि 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारताकडे होती. मात्र, न्यूझीलंडने ‘करो किंवा मरो’च्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत भारताला पराभूत केले आणि मालिकेत बरोबरी साधली.

आता दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि अंतिम सामना रंगणार असून, या लढतीत मालिकेचा विजेता ठरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा निर्णायक सामना रविवारी, 18 जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल, तर नाणेफेक 1 वाजता होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट पाहता येणार असून, जिओहॉटस्टार अ‍ॅपवरही लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दरम्यान, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली आहे. 2006 ते 2023 या कालावधीत भारताने या मैदानावर एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले असून, ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या मैदानावर अद्याप एकही एकदिवसीय सामना न गमावलेला भारत, रविवारी सलग आठवा विजय नोंदवत मालिका आपल्या नावावर करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ