spot_img

Mohan Agashe on BMC Election : “मतदान केलं… पण भावना शून्य आहेत” – ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंचं राजकारणावर परखड भाष्य

spot_img

“डोळे-कान उघडे ठेवा, पण तोंड बंद ठेवा” – मतदारांना आगाशेंचं सूचक आवाहन

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडलं असून, या निवडणुकीत 15,931 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह या सर्व महापालिकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी मतदान होत असून, सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक मतदार आपला हक्क बजावत आहेत.

या लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक नामवंत सेलिब्रिटीही सहभागी झाले. पुण्यातील प्रभात रोडवरील विमलाबाई गरवारे शाळेतील मतदान केंद्रावर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत सूचक आणि विचार करायला लावणारं भाष्य केलं.
“मतदान केल्यानंतर मी भावना शून्य झाल्यासारखं वाटत आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया देत त्यांनी पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात मोठा फरक जाणवत असल्याचं सांगितलं.

आगाशे म्हणाले की, आजच्या राजकारणात कोण कुठे उभं आहे हेच समजेनासं झालं आहे. “एकदिलाने काम करण्याच्या घोषणा दिल्या जातात, पण प्रत्यक्षात तसं होईल की नाही याबद्दल शंका आहे. उपलब्ध साधनसंपत्ती आणि वाढती लोकसंख्या यावर गांभीर्याने बोलताना कुणीच दिसत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले, “लोकांना जोपर्यंत सजग केलं जात नाही, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आकाश कोसळलं तरी कुणाकडे मदतीसाठी धाव घ्यायची, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.”

पूर्वी देशासाठी निस्वार्थपणे काम करण्याची भावना होती, असं सांगत त्यांनी आजच्या राजकारणातील सतत चालणाऱ्या सत्तासंघर्षावरही टीका केली. “हे आले की त्यांना कसं पाडायचं आणि ते आले की यांना कसं हटवायचं – एवढंच सध्या दिसत आहे. एकमेकांबद्दल चांगलं बोलणं जवळपास संपलंच आहे,” असं ते म्हणाले. शेवटी मतदारांना संदेश देताना आगाशे म्हणाले, “डोळे आणि कान उघडे ठेवा, पण तोंड बंद ठेवा. जे दिसतंय, जे ऐकू येतंय ते नीट समजून घ्या. आणि मनातून जे योग्य वाटतं, तेच करा.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ