पंढरपूरमध्ये मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. चंद्रभागा नदीच्या पुलावर मोठा अपघात (Accident News)घडला असून कंटेनर आणि ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळलाय. कर्नाटकयेथून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर पंढरपूर (Pandharpur Accident) तालुक्यातील करकमकडे निघाला होता. दरम्यान ट्रॅक्टर सुरू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह पुलाखाली कोसळला आणि त्यावर कंटेनर कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन मजूर या अपघातात मृत्युमुखी पडले आहे. तर ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली काही जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या आहिल्या पुलावर रविवारच्या रात्रीच्या सुमारास हि घटना घडलीय. या घटनेत जवळपास 8 ते 10 लोक गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती आहे. तर गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावर एकत्र आल्याने आणि अंदाज न येता पुलाखाली पडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर आणि कंटेनरला काढण्याचं काम करण्यात आलंय. तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.




