ओतूर,प्रतिनिधी:दि.१२ जानेवारी ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील ग्राम विकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालय ओतूरचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यालयाची विद्यार्थिनी शर्वरी राजेंद्र आरोटे ही राज्य गुणवत्ता यादीत ८१ वी आली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली. या दोन्ही परीक्षेस विद्यालयातील १४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैंकी अ श्रेणी २८ विद्यार्थ्यांना,ब श्रेणी ५१ विद्यार्थ्यांना क श्रेणी ६८ विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. शासकीय चित्रकला परीक्षा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ आणि कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेतली जाते. चैतन्य विद्यालय ओतूरमध्ये शासकीय चित्रकला परीक्षेचे केंद्र आहे. या परीक्षेला परिसरातील वीस माध्यमिक शाळांचे ६४३ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना कलाक्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी पात्र ठरविणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. विद्यालयात दरवर्षी अनेक विद्यार्थी या परीक्षेत बसतात. त्यांच्या या यशामागचे कारण सातत्यपूर्ण सराव, मेहनत व एकाग्रता आहे. या परीक्षेस अ,ब,क श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावीच्या परीक्षेत सात, पाच व तीन असे वाढीव गुण मिळतात. अशी माहिती कलाविभाग प्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.
शर्वरी राजेंद्र आरोटे ( राज्य गुणवत्ता यादीत ८१वी ) ,आदित्य संतोष फापाळे, अंजली योगेश खेत्री, अथर्व विठ्ठल कुटे, गार्गी राजेंद्र आरोटे , नंदिनी दीपक पाचपुते ,नियती मनोज पटेल, पलक रामदास डोंगरे , श्रुती बाळू नलावडे, वरद चंद्रशेखर नलावडे. [ एलेमेंटरी परीक्षेत अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी ] आराध्य प्रभाकर दिघे, आराध्या मंगेश डुंबरे ,आर्या जीवन गाढवे , तन्वी प्रशांत डुंबरे, तेजल कैलास देवकर, यश्मी योगेश हांडे, सुप्रभा बाळासाहेब साबळे, स्वराज तुकाराम गायकर, शुभदा सुहास बनकर, सोनाली जितेंद्र इसकांडे, सृष्टी महादेव तौर, समृद्धी उमेश डुंबरे , रसिका प्रमोद लांडगे, ज्ञानेश्वरी विजय मांडे, कार्तिक संजय गायकर, आर्या विक्रांत बनकर, भार्गव संतोष लोहके , दिव्या दत्तात्रय हाडवळे . या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष सोनवणे व बाळासाहेब साबळे यांनी मार्गदर्शन केले
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघूनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, रोहीदास घुले, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, अजित डांगे यांनी अभिनंदन केले.




