spot_img

Shopping Tips : बाळसाठी कपडे घेताना या चुका करू नका

spot_img

फॅशनपेक्षा आराम महत्त्वाचा! नवजात बाळाच्या कपड्यांची निवड करताना उपयुक्त टिप्स

घरात बाळाचं आगमन होणं म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण. या गोड क्षणासाठी पालक आधीपासूनच तयारीला लागतात आणि बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी करून खरेदी केली जाते. मात्र, या उत्साहात अनेकदा बाळाच्या कपड्यांवर जास्त खर्च होतो आणि प्रत्यक्ष वापरात ते कपडे गैरसोयीचे ठरतात. बाळाची त्वचा अतिशय नाजूक असल्यामुळे कपड्यांची निवड करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.

योग्य कापडाची निवड करा:

बाळाच्या वयानुसार आणि गरजेनुसार कपड्यांची यादी आधी तयार करावी. फार फॅन्सी किंवा जड कापडाचे कपडे टाळावेत. चुकीच्या कापडामुळे बाळाच्या त्वचेला खाज, पुरळ किंवा इतर त्रास होऊ शकतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ठिकाणी दरांची तुलना करूनच खरेदी करणे फायद्याचे ठरते.

थोडे मोठ्या साईजचे कपडे घ्या:

लहान बाळांची वाढ अतिशय वेगाने होते. आज जे कपडे फिट बसतात, ते काही महिन्यांतच छोटे पडू शकतात. त्यामुळे बाळाच्या सध्याच्या वयापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे कपडे घेणे अधिक उपयोगी ठरते.

साधेपणालाच प्राधान्य द्या:

बाळासाठी नेहमी साधे आणि हलके कपडे निवडावेत. फ्रिल्स, जड डिझाइन किंवा सिल्कसारखे कापड टाळलेलेच बरे. असे कपडे बाळाच्या त्वचेला त्रासदायक ठरू शकतात आणि वारंवार बदलण्याची गरज भासते.

ऋतुमानानुसार कपडे घ्या:

कपड्यांची निवड करताना हवामान लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यासाठी मऊ आणि सुती कपडे उत्तम असतात, तर हिवाळ्यात कानटोपी, स्वेटर, मोजे यांसारख्या उबदार वस्तू घ्याव्यात. हिवाळी कपड्यांसाठी मऊ लोकर असलेले कपडे निवडावेत.

ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा:

आजकाल ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बाळांच्या कपड्यांसाठी खास वेबसाइट्सवर चांगल्या ऑफर्स मिळतात. मात्र, खरेदीपूर्वी कपड्यांचे कापड, साईज आणि किंमत यांची नीट तुलना करणे आवश्यक आहे. थोडी काळजी आणि योग्य निवड केल्यास बाळ आरामात राहील आणि तुमची खरेदीही उपयोगी ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ