spot_img

Makar Sankrant Jewellery : मकर संक्रांतीला खास आकर्षण! घरच्या घरी बनवा हलव्याचे सुंदर दागिने

spot_img

महाग दागिन्यांना पर्याय ठरतील हे घरगुती हलव्याचे दागिने; सोपी पद्धत जाणून घ्या

हिंदू धर्मातील मकर संक्रांती हा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण मानला जातो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून या सणाला सुरुवात होते. संक्रांतीच्या दिवशी स्नान, पूजा, दानधर्म याला विशेष महत्त्व असते. यासोबतच पतंग उडवण्याची मजा, लहान मुलांचा उत्साह आणि महिलांचे हळदी-कुंकू हे या सणाचे खास आकर्षण असते.

संक्रांतीच्या निमित्ताने नवविवाहित महिलांना हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. तसेच लहान मुलांचे बोरन्हाणही या दागिन्यांनी घातले जाते. बाजारात विविध प्रकारचे हलव्याचे दागिने मिळतात, मात्र त्यांची किंमत अनेकदा जास्त असते. त्यामुळे यंदा हे दागिने घरीच तयार करण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो.

घरच्या घरी हलव्याचे दागिने बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. रवा, साखर, पाणी, तूप, फूड कलर, दोरा आणि सुई यांच्या मदतीने हे दागिने सहज तयार करता येतात. सर्वप्रथम साखरेचा साधा पाक तयार करावा. पाकाला तार येणे आवश्यक नसते. दुसऱ्या बाजूला कढईत तूप गरम करून त्यात रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजावा. नंतर त्यात तयार केलेला पाक मिसळून मिश्रण सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा.

त्यानंतर हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. हे मणी दोऱ्यात ओवले की सुंदर हार, बांगड्या किंवा कानातले सहज तयार होतात. सजावटीसाठी फूड कलरचा वापर करता येतो. तसेच पुठ्ठा, गोंद किंवा रंगीत कागद वापरून दागिन्यांना आणखी आकर्षक रूप देता येते.

यंदा मकर संक्रांतीला बाजारातून दागिने खरेदी करण्याऐवजी घरच्या घरी बनवलेले हलव्याचे दागिने वापरून सण अधिक खास आणि आनंदी साजरा करता येईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ