spot_img

Marathi Film : ‘क्रांतिज्योती विद्यालय’ बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल! जोरदार कमाई करणाऱ्या चित्रपटाने प्रेक्षकांना घातली भुरळ

spot_img

मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला तब्बल 3.91 कोटींचा गल्ला जमवला आहे. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपट हाऊसफुल (Housefull) जात असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ