spot_img

Navi Mumbai : नवी मुंबई – महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग क्र. 7 मध्ये भाजपाचा प्रचाराचा नारळ फुटला

spot_img

विजय गायकवाड – नवी मुंबई

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रभाग क्र. 7 मधून भाजपच्या उमेदवारांनी नेस्ट हेरिटेज या सोसायटीमधून प्रचारास सुरवात केली. यावेळी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील,दीपक म्हात्रे, हेमंत म्हात्रे, मनोहर पाटील, मोनिश पाटील,व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. प्रभाग 7(अ )चे उमेदवार हरीशचंद्र वाघमारे, 7(b) रंजना मनोहर पाटील, 7 ( क ) मोनिका लक्ष्मीकांत पाटील, 7( ड) लक्ष्मीकांत पाटील यांनी आपल्या प्रचारास सुरवात केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पहिल्यांदाच पॅ- नल सिस्टीमने होणार आहेत. त्यामुळे मतदारा मध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांना उमेदवारांनी मतदान कसे करावे याचे मार्गदर्शन केले. व मतदारांना ‘ कमळ ‘ चिन्हा समोरील बटन दाबून उमेदवारांना मतदान करावे यासाठी आवाहन केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ