spot_img

Otur News : ओतूर येथील पानसरेपटात बिबट्या जेरबंद

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.४ जानेवारी ( रमेश तांबे )

ओतूर ( ता.जुन्नर ) जवळील पानसरेपटात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये,रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे माहिती देताना म्हणाले की,ओतूर येथील पानसरेपट कॅनॉल व परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे येथील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती. त्या मागणीनुसार गजानन पानसरे,संतोष पानसरे यांच्या कॅनॉल जवळील घराशेजारी दि.२२ डिसेंबर रोजी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.

या पिंजऱ्यामध्ये रविवारी दि.४ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे आठ वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच, तात्काळ सदर ठिकाणी ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे ओतूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे वनपाल,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक किशन खरोडे,किसन केदार,गणपत केदार,रोहित लांडे,  प्रदीप तांबे यांनी तात्काळ पोहोचून पाहणी करून सदर बिबट्याला ताब्यात घेतले.या कामी  राजाराम पानसरे,नरेंद्र डुंबरे,राजेश पानसरे,गजानन पानसरे,बाजीराव पानसरे,संतोष पानसरे,सुनील पानसरे व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले असून,सदर बिबट्याच्या मादीस माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. ओतूर  आणि परिसरात बिबट व अन्य वन्य प्राण्यासंबंधित कुठलीही समस्या असल्यास,नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ