स्ट्रेसमुक्त जीवन, नैसर्गिक सवयी आणि रसायनांपासून अंतर – केसांच्या आरोग्याचं गुपित इथेच दडलंय
आपण रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर किंवा मंदिराच्या बाहेर अनेकदा भिकारी किंवा साधूंना पाहतो. त्यांच्या एक गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्यांचे दाट, लांब आणि मजबूत केस व दाढी. विशेष म्हणजे, कोणतेही शॅम्पू, कंडिशनर किंवा महागडे हेअर ट्रीटमेंट न करता देखील त्यांचे केस निरोगी दिसतात. दुसरीकडे, आपण हजारो रुपये खर्च करूनही केस गळणे, टक्कल पडणे अशा समस्यांशी झुंज देतो. मग नेमकं कारण काय असावं? निरीक्षण केलं तर जवळपास ९० टक्के भिकाऱ्यांच्या डोक्यावर आजही भरपूर केस दिसतात. यामागे काही शास्त्रीय आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत.
रसायनांपासून दूर राहणे
आज आपण वापरत असलेल्या बहुतांश हेअर प्रॉडक्ट्समध्ये सल्फेट, पॅराबेन्स आणि इतर केमिकल्स असतात. ही रसायने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम करतात. याउलट, भिकारी केस धुताना शॅम्पू किंवा कंडिशनर वापरत नाहीत. त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल जपलं जातं आणि तेच तेल केसांच्या वाढीस पोषक ठरतं.
सूर्यप्रकाशातून मिळणारं व्हिटॅमिन डी
केस मजबूत राहण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचं मानलं जातं. मात्र, एसी ऑफिस, घरातील बंद वातावरणामुळे आपल्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. भिकारी मात्र दिवसभर उन्हात असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होतं, ज्याचा थेट फायदा केस आणि दाढीला होतो.
अती काळजीचा अभाव
आज केसांसाठी ड्रायर, स्ट्रेटनर, रंग, वेगवेगळी उत्पादने वापरण्याची सवय वाढली आहे. ही ‘ओव्हर केअर’च अनेकदा केसांचं नुकसान करते. भिकारी मात्र केसांवर कोणतेही प्रयोग करत नाहीत. त्यामुळे केस नैसर्गिक स्वरूपात राहून अधिक सुरक्षित राहतात.
तणावमुक्त जीवनशैली
केस गळण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मानसिक ताण. नोकरी, पैसा, स्पर्धा आणि भविष्यासंबंधी चिंता यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, जे केसांच्या मुळांवर परिणाम करतात. भिकाऱ्यांचं जीवन तुलनेने तणावमुक्त असतं. ‘मिळेल त्यात समाधान’ ही वृत्ती त्यांच्या मानसिक आरोग्याला स्थैर्य देते, आणि त्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या आरोग्यावर दिसून येतो.
एकंदरीत पाहिलं तर, भिकाऱ्यांचे घनदाट केस हे कोणत्याही चमत्कारामुळे नाही, तर नैसर्गिक जीवनशैली, कमी ताण आणि रसायनांपासून दूर राहण्यामुळे आहेत. कदाचित आपल्यालाही केसांसाठी नव्या ट्रेंडपेक्षा नैसर्गिक सवयींकडे वळण्याची गरज आहे.




