spot_img

IPL 2026 : IPL 2026आधी दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठा बदल? अक्षर पटेलचं कर्णधारपद धोक्यात, नव्या कॅप्टनची चर्चा रंगात

spot_img

मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षर पटेलची उचलबांगडी, केएल राहुलकडे दिल्लीची धुरा जाण्याची दाट शक्यता

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) नुकताच मिनी ऑक्शन पार पडला असून, त्यानंतर आता फ्रँचायजी पातळीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या मिनी ऑक्शनमध्ये 10 संघांनी गरजेनुसार 77 खेळाडूंची निवड केली. कॅमरुन ग्रीन हा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर अनेक अनकॅप्ड खेळाडूंनाही अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, चाहत्यांच्या नजरा आता IPL 2026 च्या सुरुवातीच्या तारखेवर लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा मोसम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्सने ऑलराउंडर अक्षर पटेल (Axar Patel) याला कर्णधारपदावरून हटवल्याचं सांगितलं जात आहे. अक्षरने मागील हंगामात संघाचं नेतृत्व केलं होतं, मात्र त्याच्या नेतृत्वात दिल्लीला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही आणि साखळी फेरीतच संघाचा प्रवास थांबला. आता पुढील मोसमात अक्षर केवळ खेळाडूच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

अक्षरनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी केएल राहुलचं (K. L. Rahul) नाव आघाडीवर आहे. केएल राहुलकडे आयपीएलमधील कर्णधारपदाचा भक्कम अनुभव आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं (Lucknow Super Giants) नेतृत्व केलं आहे. त्यामुळे दिल्लीची धुरा केएलकडे सोपवली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे कारण दिल्ली कॅपिटल्सने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून, नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, अक्षर पटेलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 162 सामने खेळले आहेत. 124 डावांत 3 अर्धशतकांसह 1,916 धावा केल्या असून, 159 डावांत 128 विकेट्सही घेतल्या आहेत. आता आगामी मोसमात अक्षर कोणत्या भूमिकेत दिसणार आणि दिल्लीचा नवा कॅप्टन कोण असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ