पुणे (Pune) जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (Junnar) व समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर मधील श्रीराज प्रमोद कुमार जाधव (Pramod Kumar Jadhav) याने तयार केलेल्या चोरी विरोधी यंत्रणा या प्रकल्पाची पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये श्रीराज प्रमोदकुमार जाधव याने तयार केलेला चोरी विरोधी यंत्रणा चोरीविरोधी तपासणी प्रणाली याचा प्रथम क्रमांक आला. या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. तसेच चला प्रयोग करूया या प्रकल्पाचा इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये द्वितीय क्रमांक आला. भित्तिपत्रक या स्पर्धेमध्ये सहावी ते आठवी या गटात नचिकेत प्रदीप सूर्यवंशी याचा द्वितीय क्रमांक व पावर पॉइंट प्रेझेंटेशन या स्पर्धेत अंजली योगेश खेत्री हिचा इयत्ता नववी ते बारावी या गटामध्ये द्वितीय क्रमांक आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर,पर्यवेक्षक अनिल उकिरडे, विज्ञान विभाग प्रमुख भगवंता घोडे,पंकज घोलप,मंगेश तांबे,विशाल चौधरी,संतोष कांबळे,मिलिंद खेत्री,अनिल जवरे,रसिका शेळके,संतोष सोनवणे,बाळासाहेब साबळे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे,रघुनाथ तांबे,प्रदीप गाढवे, पंकज घोलप,मुख्याध्यापिका राजश्री भालेकर,संजय हिरे, अजित डांगे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




