spot_img

Soham Bandekar : बांदेकर कुटुंबातील खास सदस्याचा मृत्यू, सोहमनं शेअर केली इमोशनल पोस्ट

spot_img

बांदेकरांच्या लाडक्या सिंबानं अखेरचा श्वास घेतला आहे.

सोहम बांदेकर-पूजा बिरारीच्या लग्नाचे (Pooja Birari Soham Bandekar Wedding Photos) अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण, त्यातल्या काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. तो म्हणजे, बांदेकरांच्या घरातला सिंबा. म्हणजेच, त्यांचा पाळीव श्वान. पण, आता बांदेकर कुटुंबीयांवर (Bandekar Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बांदेकरांच्या घरातील सर्वात लाडक्या सदस्याचं निधन झालं आहे. बांदेकरांच्या लाडक्या सिंबानं अखेरचा श्वास घेतला आहे.

सिंबा खरंतर एक पाळीव श्वान होता, पण बांदेकरांसाठी तो त्यांच्या घरातील सदस्यच होता. एका मुलाखतीत बोलताना सुचित्रा बांदेकरांनी सांगितलेलं की, सिंबा आणि सोहम एकत्र लहानाचे मोठे झाले. त्याला कुणी कुत्रा म्हटलेलंही आम्हाला आवडत नाही. तो आमच्यासाठी आमच्या घरातील सदस्यच आहे. बांदेकरांची सून झालेल्या पूजा बिरारीनं लग्नासाठी हातावर मेहंदीनं सिंबाचं चित्र काढलेलं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिंबा वृद्धापकाळाच्या व्याधींनी त्रस्त होता. तसेच, सिंबाला सोहमच्या लग्नाला नेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली. लग्नसोहळ्यात वावरताना त्रास होऊ नये म्हणून बांदेकर कुटुंबानं सिंबासाठी खास गाडीही तयार केलेली. सोहम स्वतःच्या लग्नातही सिंबाची काळजी घेताना दिसला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ