ओतूर प्रतिनिधी : रमेश तांबे
श्री क्षेत्र ओतूर (Otur) (उत्तमापूर) ते श्री क्षेत्र काशी (वाराणसी) पायी पालखी सोहळ्याचे ओतूर ता.जुन्नर येथून बुधवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रयाण करण्यात आले.तत्पूर्वी ओतूरच्या सरपंच छाया तांबे,प्राजल भाटे,अक्षदा पानसरे,गीता डुंबरे, अंजली डुंबरे यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांंना फराळ देण्यात आले.या पदयात्रेबद्दल दिंडी सोहळ्याचे संस्थापक ह.भ.प.गंगाराम डुंबरे व अध्यक्ष गणपत डुंबरे माहिती देताना म्हणाले की, या पदयात्रेचे हे 22 वे वर्ष असून, पदयात्रेद्वावारे सर्धर्मसमभावाचा संदेश तसेच सर्व जाती- धर्मात प्रेम व शांतीचा प्रचार व प्रसार व्हावा हा हेतू आहे.हाच संदेश सुमारे 400 वर्षांपूर्वी श्री क्षेत्र ओतूर(उत्तमापूर) ते श्री क्षेत्र काशी असा 1800 किलोमीटरचा प्रवास सदगुरु बाबाजी चैतन्य महाराजांनी पायी वारी करुन विश्वेश्वर मंदिरात कीर्तन केले असा इतिहास आहे.

या पालखी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे. या वारीसाठी वारकऱ्यांंना दोन महिने दहा दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.पालखीसोहळ्याचामार्गओतूर,आळेफाटा,घारगाव,हिवरगाव,पावसा,कोकणगाव,निमगाव,जाळी,लोणी,बुद्रुक,शिर्डी,कोपरगाव,येवला,मनमाड,चौंढी,वऱ्हाणे,देहगाव,चिखलओहोळ,धुळे,लळींगकिल्ले,आर्वी,नगाव,सोनगिर,नरडाणा,शिरपूर, सांगवी, पालासनेर,सैधवा,बडा मलहरा,मुंगवारी,मांतगुवा,छतरपुर उजारा,गडीमलहारा (मध्यप्रदेश भैरवगंज,महोवा ,अलिपूरा,मटौध,बांदा,खुरहण्ड(उत्तरप्रदेश)उत्तर्रा,भरतकुप,चित्रकुट,कालपूर,लालापूर,रैपुरा,इटवा,छिवलाह,मुरका,लोहगरा,जसरा(मण्डीस्थळ)अलाहबाद,प्रयागराज,झुँसी,(त्रिवेणी संगम) अदवॉ, हनुमानगंज, बिंदा(सौदाबाद), हंडिया, सितामढी,सफीनगर (गोधना)अमवॉ (गैपीगंज) बेहडा,जगतपूर येथून पालखी शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री क्षेत्र काशीमध्ये प्रवेश करणार आहे.रविवार दि.15 रोजी महाशिवरात्रीच्या पर्वणीवर काशी येथे दिंडी प्रदक्षिणा व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.पालखी सोहळा प्रस्थान वेळी या पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक ह.भ.प.गंगाराम महाराज डुंबरे, अध्यक्ष गणपत डुंबरे,ह.भ.प तुळशिराम महाराज सरकटे,ह.भ.प तुकाराम महाराज ढोमसे,ह.भ प नितीन महाराज हाडवळे,ह.भ.प.राजेंद्र महाराज फापाळे,ह.भ.प धोंडीभाऊ महाराज पानसरे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,बबन भोरे,लक्ष्मण घूले,सुभाष गाढवे,श्रीराम डुंबरे,अशोक फापाळे,संतोष फापाळे,पांडुरंग तांबे,राजेंद्र डुंबरे,अविनाश ताजणे,आंबादास डुंबरे,प्रकाश फापाळे,विमल काशिद,विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे,माजी जि.प,सदस्य मोहित ढमाले,तुषार थोरात,आत्माराम गाढवे,रोहोकडी गावचे माजी सरपंच सुदाम घोलप,सचिन घोलप,दत्तात्रय डुंबरे,वसंत डुंबरे,प्रभाकर ठिकेकर,देविदास फापाळे,किसन फापाळे यांच्यासह ओतूर आणि परिसरातील महिला,भाविक,वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




