spot_img

Gautami Patil in Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये गौतमी पाटील झळकणार?

spot_img

गौतमीचा कार्यक्रम कुठेही असो, तिथे गर्दी होणारच. ती स्टेजवर आली की, आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते. लहान मुलं, म्हातारे-कोतारे, महिला सगळ्यांनाच ती तिच्या तालावर थिरकायला भाग पाडते. स्टेज परफॉर्मन्स करणाऱ्या गौतमी पाटीलनं (Gautami Patil) नुकतीच मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आहे. गौतमीनं सिनेमा केलाय, काही सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग्सही केलेत. त्यासोबतच गौतमी पाटील अनेक म्युझिक अल्बम्समध्येही झळकली आहे. अशातच महाराष्ट्राची सेन्सेशन असलेली सबसे कातील गौतमी पाटील आता ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनवेळीही अशीच चर्चा रंगलेली. त्यावेळी गौतमीनं सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या पण, ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) आगामी सीझनमध्ये झळकणार का? यावर गौतमीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

नुकतीच गौतमी पाटीलनं एबीपी माझाला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना गौतमी पाटीलनं ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) सहाव्या पर्वात जाणार की, नाही याबाबत स्पष्टीकरण दिलेलं. तसेच, गौतमीनं या मुलाखतीत बोलताना एक महत्त्वाचा खुलासाही केलाय. यावेळी गौतमी पाटीलसोबत प्रसिद्ध गायक अभिजीत जाधवही उपस्थित होता. गौतमी पाटीलनं गायक अभिजीत सावंतसोबत ‘रुपेरी वाळूत’ हे गाजलेलं मराठी गाणं रिक्रिएट केलं आहे. हे गाणं अभिजीत सावंतनं गायलंय, तर अल्बममध्ये त्याच्यासोबत गौतमी पाटील झळकली आहे. सध्या दोघांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ