spot_img

Huma Qureshi : अभिनेत्री हुमा कुरेशीच्या प्रवासामागील धडकी भरवणारी गोष्ट!

spot_img

पहिल्याच चित्रपटाच्या ऑफरवर पालकांचाच विश्वास बसला नाही; ‘दिल्ली क्राईम 3’मधील भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत हुमा

चित्रपटसृष्टीचं जग झगमगटं असलं तरी त्यामागे अनेक थरारक आणि विश्वास बसणार नाही अशा घटना दडलेल्या असतात. विशेषत: चित्रपटक्षेत्राशी कोणताही संबंध नसलेल्या घरातील मुलीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकायचं म्हटलं की पालकांची काळजी अधिकच वाढते. असंच काही अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) हिच्याबाबतही घडलं होतं.

सध्या ओटीटीवर झळकलेल्या ‘दिल्ली क्राईम’ (Delhi Crime) सीझन 3 मधील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे हुमा जबरदस्त चर्चेत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही तिच्या कामाचं कौतुक होत आहे.

हुमा कुरेशीने 2012 मध्ये अनुराग कश्यप (Anurag Kahsyap) दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून कारकीर्द सुरू केली. तिच्या अभिनयाने तेव्हा गोविंद निहलानींसारख्या दिग्दर्शकांनाही प्रभावित केलं होतं.

परंतु हुमा ला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली तेव्हा तिचे आई-वडील हादरलेच. आपल्या मुलीला कोणी चित्रपटात का घेईल? ही ऑफर खरी असेल का? असे प्रश्न त्यांना छळत होते. एवढंच नव्हे तर हे वेश्याव्यवसायाच्या जाळ्याचं आमिष तर नाही ना, असा संशयही त्यांच्या मनात आला होता.

हुमा सांगते, “माझ्या आई-वडिलांना सुरुवातीला कधीच वाटलं नव्हतं की मी खरंच अभिनय करू शकते. पहिल्या चित्रपटासाठी मला कास्ट केलं, असं सांगितल्यावर त्यांनी विश्वास ठेवायलाच तयार नव्हते.”

तिने पुढे सांगितलं की, “मी ऑफिसमध्ये जाऊन स्क्रिप्ट वाचली, त्याच दुसऱ्या दिवशी मला स्क्रीन टेस्टसाठी निवडलंही होतं. पण हा चित्रपट नंतर कधी पूर्णच झाला नाही.”

आज मात्र त्या सुरुवातीच्या आठवणींवर तिच्या चेहऱ्यावर हलके हसू आले. आई-वडिलांची भीती, अविश्वास, आणि अनोळखी जगाची चिंता हे सर्व मागे टाकत हुमा आज बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवत आहे.

हुमा कुरेशीने आतापर्यंत अनेक दमदार भूमिका करून चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावरही ती कायम सक्रिय असून तिच्या फोटोज आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ