spot_img

Dharmendra 90th Birthday : धर्मेंद्र यांची तब्येत सुधारली 90 व्या वाढदिवसासाठी देओल कुटुंबात उत्साहाची लहर

spot_img

ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; 8 डिसेंबरला खास कौटुंबिक सोहळ्याची तयारी सुरू

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharemendra) यांच्या प्रकृतीने मागील काही दिवसांत चाहत्यांना काळजीत टाकले होते. तब्येतीची तक्रार वाढल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होती, तर कुटुंबीयही सातत्याने त्यांच्या सोबत होते.

मात्र दिलासादायक बाब म्हणजे आता धर्मेंद्र यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्यांना घरी आणण्यात आले आहे. त्यांच्या घरी परतीच्या बातमीने चाहत्यांपासून ते त्यांच्या सहकलाकारांपर्यंत सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

धर्मेंद्र यांचा वाढदिवस अगदी जवळ आला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी ते 90 वर्षांचे होणार आहेत. प्रकृती सुधारत असल्याने देओल कुटुंबाने वाढदिवसाच्या तयारीला सुरुवात केली आहे. हेमा मालिनी (Hema Malini) एका खास, मर्यादित पाहुण्यांसाठी असलेल्या कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये केवळ निकटचे नातेवाईक आणि जिवलग मित्रांचा समावेश असेल.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने घरात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांनी रुग्णालयात वडिलांच्या सेवेत एक क्षणही कमी पडू दिला नाही. आता त्यांना पूर्ववत हसतमुख व ऊर्जावान पाहून कुटुंबातील सर्वजण निश्चिंत झाले आहेत.

दरम्यान, ईशा देओलनेही वडील बरे झाल्यानंतर आगामी उत्सव साजरा करण्याची आनंदाने तयारी सुरू असल्याचे सांगितले. चाहत्यांमध्येही धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाबद्दल प्रचंड उत्सुकता असून ते पुन्हा एकदा त्यांना निरोगी आणि तंदुरुस्त पाहण्यास आतुर आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ