हिवाळा म्हणाला कि पहिल्या शब्द डोक्यात येतो तो आळस. मस्त गुलाबी थंडी पडलेली असताना झोपेतुन उठणं हे खूप मोठं टास्क वाटत आणि अशातच आपल्याला जर कोणी म्हणलं कि उठून वर्क आऊट करा तर.. थंडीमध्ये उठून शरीराला कष्ट देऊन योग किंवा वर्कआउट कारण मोठं मुश्किलीच काम आहे. पण थंडीमध्ये शरीराला सर्वात जास्त व्यायामाची गरज असते. आपण जर आळशीपणा केला आणि व्यायाम केला नाही तर शरीरावर त्याचा नकारात्मक बदल दिसून येतो. अशा वेळी आपण थंडीच्या दिवसांत काही इनडोअर वर्कआऊट करू शकतो. ज्यामुळे तुमच्या व्यायामात खंड पडणार नाही आणि आरोग्यालाही सुदृढ राहील.
पुश-अप्स ( Push-ups )
पुश-अप्स हा प्रकार सोप्पं वाटत असला तरी तो करण्यास कठीण आहे. पण जर तुम्ही थंडीमुळे जिममध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पुश-अप्स करू शकता. ज्यामुळे तुमची श्वसनक्रिया सुधारते आणि हा एक उत्तम इनडोअर व्यायाम ठरतो. दररोज १० ते १५ पुश-अप्स मारल्याने तुमचे बायसेप्स, ट्रायसेप्स आणि छातीचे स्नायू मजबूत होतात.
स्क्वॅट्स ( Squats)
या प्रकारमुळे पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात व वजन कमी होण्यासही मदत होते. स्क्वॅट्स तुम्ही घरात कुठेही करू शकता. या करता तुम्हाला जिमला जाण्याची गरज नाही आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष इक्विपमेंटची आवश्यकता नसते.
सेटप्स अप ( Steps-up )
हा व्यायाम इतका सोप्पा आहे कि तुम्ही घरच्या घरी करू शकता. दररोज फक्त १० ते १५ मिनिटे सेटप्स अप केल्याने तुमचे हृदय निरोगी राहील आणि वजनही नियंत्रणात राहील. हा व्यायाम प्रकार तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
नृत्य ( Zumba, Belly Dance )
आजकाल झुंबाच भलतच क्रेझ लोकांमध्ये निर्माण झालं आहे. जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर फिटनेस प्रकार तुम्हाला खूप देऊ . नृत्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. बेली डान्सिंग, झुंबा करणं तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तुम्ही युट्युबवर व्हिडिओ पाहून नृत्य करू शकता.
दोरीच्या उड्या ( Jump rope )
लहानपणी आपण भरपूर्वेला दोरीच्या उद्या मारल्या असतीलपण ते आपण खेळ म्हणून खेळायचो पण याचे बरेच फायदे आहेत. हा एक सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम म्हणून याला पाहिलं जात. दररोज ५ ते १० मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते त्याबरोबरच शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.
योग आणि सूर्यनमस्कार ( Yoga )
शरीराला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने नियंत्रणात आणायचं असेल तर आपण योग आणि सूर्यनमस्कार हे इनडोअर वर्कआऊट मध्ये करू शकतो. यामुळे शरीराला फायदा तर होतोच त्याशिवाय मानसिक आरोग्यही सुधारते. दरोरोज योग केल्यानं आरोग्याला फायदा होतो.




