हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच स्वेटर किंवा गरम कपडे वापरल्यामुळे मुलींचा एकंदरीत लुक खराब होतो पण आता फॅशनप्रेमी महिलांसाठी हिवाळा म्हणजे केवळ थंडीपासून बचाव नव्हे तर नवा फॅशन सीझन सुरू होण्याचा क्षण आहे. सध्या मुलींकरता आणि मुलांकरता मार्केट्मध्ये बरेच थंडीच्या दिवसांतसुद्धा आकर्षक आणि एलिगंट दिसायचं असेल तर योग्य स्वेटर निवडणं महत्त्वाचं ठरतं. आजची पिढी आजच्या ट्रेंडमध्ये पारंपरिक डिझाइन्सना मागे टाकत, मॉडर्न टच असलेले स्वेटर लोकप्रिय होत आहेत.
1) क्लासिक फुल स्लीव्ह स्वेटर:
हे स्वेटर सोपं पण नेहमी उठून दिसणारे आहेत. हे डिझाईन सर्व वयोगटांसाठी बनल्या आहेत. पेस्टल, बेज, ऑफ व्हाईट किंवा सॉफ्ट पिंक अशा हलक्या रंगांच्या स्वेटरसला लोकांची विशेष पसंती असते. हे स्वेटर्स जीन्स, स्कर्ट किंवा फॉर्मल पँटवर उत्तम दिसतात.

2) हायब्रिड स्टाईल स्वेटर:
हुडी किंवा जॅकेटच्या डिझाईनसह असलेले हायब्रिड स्वेटर फॅशन व कम्फर्ट यांचा सुंदर मेळ घालतात. कॉलेज, ट्रॅव्हल किंवा आउटडोअर फोटोजसाठी हा लुक एकदम परफेक्ट पर्याय आहे.

3) कार्डिगन स्वेटर:
कार्डिगन स्वेटर हे ऑफिस वर्क आणि दैनंदिन वापरासाठी एक क्लासिक पर्याय आहे. हा लुक प्रोफेशनल दिसतो आणि त्याबरोबरच ड्रेस, स्कर्ट किंवा ट्राउझरवर हि सहज जुळतो. हलक्या कार्डिगनचा वापर हिवाळ्याच्या सुरुवातीला योग्य ठरतो.
4) कट-आऊट डिझाईन स्वेटर:
फॅशनमध्ये थोडं धाडस दाखवायचं असेल तर कट-आऊट डिटेल्स असलेले स्वेटर ट्राय एक उत्तम पर्याय आहे. खांद्यावर किंवा मागे हलके डिझाईन असलेले हे स्वेटर पार्टी आणि कॅज्युअल आउटिंगसाठी परफेक्ट आहेत.





