spot_img

Black Eggs vs White Eggs :प्रोटीन आणि हेल्थच्या बाबतीत सफेद-अंड्यांपेक्षा काळी अंडी आघाडीवर?

spot_img

फिटनेसप्रेमींसाठी नवा सुपरफूड पर्याय जास्त प्रोटीन, कमी फॅट आणि जबरदस्त पोषणमूल्य असलेली कडकनाथ अंडी लोकप्रियतेच्या शिखरावर

आजच्या काळात लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. ‘कधी काय खायचं?’ याकडे आता सर्वांचंच विशेष लक्ष असतं. त्यामुळे पौष्टिक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे. यामध्ये अंडीही महत्त्वाची भूमिका बजावतात. बाजारात सामान्यतः सफेद आणि तपकिरी रंगाची अंडी सहज मिळतात, पण आता काळ्या अंड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतो आहे.

ही काळी अंडी (Black Eggs) म्हणजे कडकनाथ या खास कोंबडीच्या प्रजातीची असतात. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात आढळणाऱ्या या कोंबडीचे पंख, मांस आणि अगदी अंड्याचे कवचही काळ्या रंगाचे असते. दिसायला वेगळी असली तरी या अंड्यांमध्ये पोषणमूल्य अफाट असते.

तज्ज्ञांच्या मते, 100 ग्रॅम कडकनाथ अंड्यात तब्बल 15.6 ग्रॅम प्रोटीन असते. जे सामान्य अंड्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. शिवाय यात फॅट फक्त 1 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल 180 मिलीग्रॅम इतकेच असते. साध्या अंड्यात फॅट 5.8 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल जवळपास 372 मिलीग्रॅम असते. त्यामुळे वजन कमी ठेवायचे असेल किंवा स्नायू मजबूत करायचे असतील तर कडकनाथ अंडी उत्तम पर्याय आहेत.

फक्त प्रोटीनच नाही, तर या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड्सचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्कीन आणि केसांचे आरोग्य सुधारते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

एकूणच, काळी म्हणजेच कडकनाथ अंडी हे आजच्या फिटनेस-फ्रेंडली जीवनशैलीत सुपरफूड म्हणून समोर येत आहेत. सफेद आणि तपकिरी अंड्यांप्रमाणे ही अंडीही पौष्टिक असली, तरी प्रोटीन आणि हेल्थ बेनिफिट्सच्या बाबतीत कडकनाथ अंडी नक्कीच एक पाऊल पुढे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ