spot_img

Detox water for weightloss |वजन कमी करत आहात ? त्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजेच डिटॉक्स वॉटर…..

spot_img

आजच्या युगात वाढते वजन हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे . सगळ्यांनाच आपले वजन कमी असावे आणि आपला फिगर टिकून राहावी असे वाटत असते. त्या साठी वेगवेगळे घरगुती उपाय आपण करतच असतो , जसे की जिम, योगा, डाएट, इत्यादी. काही जण वजन कमी करण्यासाठी आहारात प्रकारचे बदल करतात. पण तुम्हाला माहित आहै का डिटॉक्स वॉटर हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

डिटॉक्स वॉटर पिल्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यासाठी सतत हायड्रेटेड राहणे अत्यंत आवश्यक असते कारण हे शरीराच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. डिटॉक्स वॉटर शरीरातून अधिक जलद गतीने कॅलरीज जाळण्यासाठी शरीरातील रासायनिक प्रक्रियेची गती वाढवते. आणि मेटाबोलिसम वाढवते. आणि त्याचमुळे शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होते. आपण कामावर जाताना पाण्याची बाटली तर घेऊनचं जात असतो तर आपण त्यामध्ये काही घटक टंकले तर ते चव निर्माण करतात त्यामुळे पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित करू शकतये

एक बाटली मध्ये एक लिंबू गोल चिरून टाका कारण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-६, पोटॅशियम, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स. हे घटक वजन कमी करण्यास मदत करतात. आणि एक काकडी त्यामध्ये बारीक कापून टाकली तर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे कारण ती कॅलरीमध्ये कमी आणि पाणी व फायबरमध्ये जास्त आहे. काकडीमध्ये असलेले पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते, तर फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि जास्त खाणे टाळता येते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्या मध्ये थोड्या प्रमाणात पुदिना तुम्हाला पोट भरल्याची भावना येते आणि पुदिन्या मध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते त्यामुळे पाणी आजून चविस्ट होत्ये आणि त्ये शरीराला थंड ठेवण्या साठी मदत करते त्यानंतर त्यामध्ये थोड्या प्रमाणात सब्जा टाका त्यामध्ये जास्त फायबर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे पोट भरण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे भूक कमी लागते .

आशा प्रकारे हे सगळे एकत्र करून घेतले कि डिटॉक्स वॉटर तयार होते १ ते २ लिटर डिटॉक्स वॉटर रोज पिल्याने झटपट वजन कमी होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ