spot_img

Sugarcane : ऊस खाल्याने शरीराला होतात फायदे ? ऊस चावून खावा कि पिऊन ?

spot_img

ऊस (Sugarcane) आरोग्यासाठी अति उत्तम मानला जातो. पण काही ठिकाणी ऊसाला धार्मिक महत्त्व देखील आहे . आपल्या इथे प्रसादासाठी देखील ऊसाचा वापर होतो. कोणत्याही शुभ प्रसंगी उसाला पुजलं जात. एवंढच नाही तर, ऊस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. चवीला गोड असूनही आरोग्यासाठी फायदेशीर असलेला ऊस, ऊस त्वरित ऊर्जा वाढवतो आणि पचन सुधारतो. त्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करतो.

ऊस (Sugarcane) आणि त्याचा रस हे त्वरित ऊर्जा देणारे पदार्थ आहेत आणि ऊस चावल्याने शरीराला ग्लुकोज मिळतो, ज्यामुळे आपल्या शरीराला दीर्घकाळन ऊर्जा मिळते आणि दुसरीकडे, उसाचा रस पिल्याने ग्लुकोज लगेच तयार होतो ज्याचा परिणाम थकवा दूर होणे असा होतो. म्हणून, दोन्ही पद्धती सकाळी किंवा व्यायाम केल्यानंतर ऊस खाल्याने किंवा उसाचा रस पिल्याने तो शरीरासठी उपयुक्त ठरतो. इतकेच नव्हे तर ऊस चावून खाल्याने आपले दात आणि हिरड्या मजबूत होतात. ऊस चावल्याने पोटात असलेल्या फायबरचे पचन कमी होऊन आपली पचनसंस्था मजबूत होते. उसाचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर होतात. त्याबरोबरच ऊस आणि त्याचा रस दोन्ही शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यकृत स्वच्छ करण्यासाठी उसाचा रस हा उपयुक्त ठरतो आणि हे अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराला पुरवण्यास मदत करतात. जर तुम्हाला विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उसाचे सेवन करायचे असेल तर त्याचा रस पिल्याने जलद परिणाम तुम्हाला मिळू शकतात.

ऊस चावल्याने दात स्वच्छ होतात. उसात कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असतात, जे हाडे मजबूत करतात. ऊस चावून खाल्याने दीर्घकाळ टिकणारे फायदे मिळतात. ऊस आणि ऊसाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढण्याची शक्ती देतात. ऊस चावणे आणि उसाचा रस पिणे हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला हळूहळू ऊर्जा वाढवायची असेल आणि पोटाच्या समस्या दूर करायच्या असतील आणि दात आणि हिरड्यांची काळजी घ्यायची असेल तर ऊस चावणे चांगले आहे . पण जर तुम्हाला तात्काळ ऊर्जा वाढवायची असेल किंवा डिटॉक्सची गरज असेल, उन्हाळ्यात थोडीशी थंडी हवी असेल तर उसाचा रस पिणे अधिक प्रभावी आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ