spot_img

Alcohol : लोक दारू का पितात? काय असतं नक्की दारूत?

spot_img

आपण बऱ्याचदा पाहतो , दारू (Alcohol )पिल्यानंतर लोक कधीच होश मध्ये नसतात. नशेत तल्लीन झालेले लोक नशेत काहीही बरळू लागतात. जणू काही जगाच त्यांना भान नसतं. शांत असणारे अचानक मोठ्याने बोलू लागतात. नशेत ते विनोद काय करतील, भांडण काय करतील. बेफाम झालेले असतात. अगदी म्हणजे जो व्यक्ती तोंडातून एक शब्द काढत नाही तो देखील वाघासारखा वागवू लागतो. पण या दारूमध्ये नक्की काय असत ज्याने माणूस असा वागतो. कोणते रसायन असते नक्की यात? जाणून घ्या..

दारू शरीरात गेल्यानंतर ती सर्वात प्रथम मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर म्हणजेच संदेशवाहक रसायनांवर परिणाम करते. यातील सर्वात महत्त्वाचं रसायन आहे ते GABA (Gamma-Aminobutyric Acid). दारू हे रसायन सक्रिय करतं ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावते. दारूमुळे व्यक्तीला मनाला आराम मिळतो, ताण कमी होतो आणि मनाला एक“सेफ्टी”ची फीलिंग निर्माण होते. एकदम हवेत तरंगल्याचा भास होतो. डोकं हलकं वाटू लागत. मनात कोणती गोष्ट राहत नाही. म्हणूनच अनेक लोक म्हणतात, “एक प्याल्यावर सगळ्या चिंता नाहीशा होतात! मनाला सुरक्षित वाटत आणि आधार वाटतो.” दारू फक्त GABA वरच नाही, तर मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवरही परिणाम करते आणि हाच तो भाग आहे जो आपल्या विचारांना, निर्णयांना आणि वर्तनाना नियंत्रित ठेवतो. दारू पिल्यानंतर हे नियंत्रण कमी होतं आणि आपण मोकळेपणाने बोलू लागतो, मोठ्याने हसतो, आणि कधीकधी न सांगितलेल्या गोष्टी सांगू लागतो. मनावर कोणताही ताबा राहत नाही. भावना उत्तेजित होतात. ज्यामुळे नशेत लोकांकडून बरीच गैर कृत्य देखील घडतात.

इतक सगळं असूनंही दारू शरीरासाठी हानिकारक असते. दारू तात्पुरता आत्मविश्वास आणि आनंद देते, पण त्याबरोबरच दीर्घकाळ तिचे सेवन केल्यास शरीरावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बरीच लोक दारूला “कॉन्फिडन्स ड्रिंक” समजतात जे कि चुकीचं आहे. खरा आत्मविश्वास आपल्या विचारांतून आणि कृतीतून निर्माण होतो, दारूच्या सेवन करून नव्हे. दारूचे सेवन करणे टाळावे अन्यथा शरीराला आणि आयुष्याला याचा मोठा फटका बसू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ